

Pune Land Scam
esakal
पुणे शहरात सलगपणे होणाऱ्या जमीन घोटाळ्यांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. आता राज्याच्या कृषी विभागाच्या मालकीच्या जमिनीचा अपहार केल्याप्रकरणी खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यात तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्यासह शितल तेजवानी, दिग्विजय पाटील यांच्यावर सरकारी जमिनीवर बेकायदेशीर ताबा मिळवल्याचा आरोप आहे. नायब तहसीलदार प्रवीणा चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला.