संजय राऊत यांनी आत्मविश्वास गमावला, प्रवीण दरेकरांचा टोला

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 19 November 2020


''भाजपने केलेली कामे आणि पक्षाची भविष्यातील धोरणे पाहता या पक्षावर पदवीधरांचा विश्वास आहे. त्यामुळे संग्राम देशमुख यांना मतदारांची पसंती मिळेल. असा विश्वास दरेकर यांनी यावेळी व्यक्त केला

पुणे : खासदार संजय राऊत यांचा आत्मविश्वास गमावला आहे. त्यांच्या बोलण्यात पूर्वीइतका विश्वास दिसत नाही. मुंबईकर ठरवतील सत्तेचा झेंडा कोणाकडे द्यायाचा? त्यामुळे  मुंबई महापालिकेवर आमचाच भगवा असेल, याचे कोणाकडे पेटंट नाही.'' अशी टिका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषेदेत ते बोलत होते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

''भाजपने केलेली कामे आणि पक्षाची भविष्यातील धोरणे पाहता या पक्षावर पदवीधरांचा विश्वास आहे. त्यामुळे संग्राम देशमुख यांना मतदारांची पसंती मिळेल. असा विश्वास दरेकर यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच ते  पुढे म्हणाले की, ''राज्य सरकारमधील घटक पक्षांत ताळमेळ नाही. कॉलेज बंद आहेत, परीक्षा नाहीत, अभ्यासिका बंद आहेत, त्यामुळे सरकारचे धोरण कळत नाही. या मतदारांत चीड आहे.
''
 पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

''भाजपचे देशमुख निवडून आल्यास पदवीधरांना नोकरी मिळवून देण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करू. या घटकाला उद्योग क्षेत्रात प्रोत्साहन देऊ'' असे आश्वासन दिले.

''पुणे पदवीधर विधान परिषद मतदारसंघातूनही तिकिट न मिळाल्याने पुण्यातील इच्छुक महापौर मुरलीधर मोहोळ, माजी आमदार मेधा कुलकर्णी, राजेश पांडे नाराज नाहीत. कुलकर्णी नाराज नाहीत, त्यांची काळजी भाजप घेईल. आमच्याकडे मतभेद नाहीत. राज्य सरकारमध्ये शिवसेना-राष्ट्रवादीचे नेते काँग्रेसची फरपट करीत आहे. हे या पक्षाला कळायला हवे.'' अशी माहिती  दरेकर यांनी यावेळी बोलताना दिली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Graduate Election 2020 Pravin Darekar Taunt Sanjay Raut