

Pune Graduate election counting latest update
esakal
Pune Graduate Constituency counting centre news : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेला सकाळी आठ वाजता सुरुवात झाली आहे. सध्या मतपत्रिकांचे ५०-५० चे गठ्ठे तयार करण्याचे काम सुरू असून, या प्रक्रियेला अंदाजे चार तास लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर पात्र आणि अपात्र मतपत्रिकांचे वर्गीकरण केले जाईल. पात्र मतपत्रिकांची एकूण संख्या निश्चित झाल्यानंतर विजयासाठी आवश्यक असलेला कोटा ठरवला जाणार आहे. या प्रक्रियेनंतर उमेदवारनिहाय मतपत्रिकांचे वर्गीकरण होईल आणि त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार आहे.