

Pune Grand Challenge Tour: Road Works on 437 KM Stretch
Sakal
पुणे : पुढील वर्षात होणाऱ्या ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर’ आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी शहर व जिल्ह्यातील ४३७ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची कामे हाती घेतली आहेत. ही कामे १५ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असून विलंब झाल्यास ठेकेदाराला प्रतिदिन एक लाखाचा दंड ठोठावण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.