

Viral Video Dog Interrupts Pune Grand Tour 2026
esakal
Pune Grand Tour 2026 : पाच दिवस चाललेल्या ‘पुणे ग्रँड टूर २०२६’ या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचा काल भव्य सांगता समारंभ पार पडला. ली निंग स्टार संघाच्या ल्यूक मडग्वेने सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर ही स्पर्धा जिंकत विजेतेपद पटकावले. पाच दिवस पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातून धावलेल्या या स्पर्धेमुळे पुणेकरांना क्रीडासोबतच मनोरंजनाचाही अनोखा अनुभव मिळाला.