
Pune : गंगा व्हिलेजमध्ये वाढदिवसानिमित्त भेट रोपाची फुलली हिरवाई
उंड्री: हांडेवाडी येथील गंगा व्हिलेज सोसायटीमध्ये सभासदांच्या कुटुंबीयांचा वाढदिवसानिमित्त वृक्ष घेतात, त्याचे संगोपन सोसायटी करते. या माध्यमातून सोसायटी मध्ये शेकडो वृक्षांची हिरवाई फुलली आहे, असे संचालक व सभासदांनी सांगितले. .
दरम्यान, वृक्षप्रेमी डॉ.अनिल पाटील म्हणाले की, शहर-उपनगरवासिय आठवड्यातून एकदा पर्यटनासाठी जातात. त्या ठिकाणी पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये हिरवाई पाहायला मिळते. मात्र, उन्हाळ्यामध्ये तीच हिरवाई वाळून जाते . त्यामुळे डोंगरमाथा, दऱ्या-खोऱ्यामधील वृक्षवल्लीला एक बाटली पाणी द्या, ती उन्हाळ्यात टिकतील आणि वाढतील, त्याचबरोबर पक्षी-प्राण्यांनाही चारा मिळेल, असे त्यांनी सांगितले.
या उपक्रमामध्ये सोसायटीचे अध्यक्ष योगेंद्र गायकवाड, सचिव दिलावर शेख, खजिनदार मधुकर जगताप, वृक्षप्रेमी संचालक डॉ. अनिल पाटील, संचालक मोहन मोरे, रंजना रणपिसे, प्रकाश खांडेकर, संजय पवार, गणेश वाडकर, अंकुश जाधव, संतोष कारंजकर, विवेक मुळे, रतन कुंडू, रोहिदास सायकर, वसीम फरास, गणेश पाटील, नितेश गद्रे, श्रीकृष्ण ताजने सुनील गव्हाळे, मधु मेनन यांचा विशेष पुढाकार असतो, असे गायकवाड यांनी सांगितले