Pune Accident: हडपसरमध्ये भीषण अपघात; 1 ठार 3 जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Accident: हडपसरमध्ये भीषण अपघात; 1 ठार 3 जखमी

Pune Accident: हडपसरमध्ये भीषण अपघात; 1 ठार 3 जखमी

पुणे : पुण्यातील हडपसर भागात कंटेनर आणि रिक्षाचा भीषण अपघात झाला आहे. भरधाव कंटेनरने दुचाकी आणि रिक्षाला धडक दिल्यामुळे रिक्षाचा चुराडा झाला आहे. यामध्ये एका जणाचा मृत्यू झाला असून ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात सकाळी ५.३० ते ६ च्या दरम्यान घडला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अपघातामुळे पुणे - सोलापूर रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली असून पोलिसांकडून अपघातातील वाहने बाजूला करण्याचे काम सुरू आहे.

(Pune Hadapsar Accident Updates)

दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्कुटीचालकाला वाचविण्याच्या प्रयत्नात सिमेंट मिक्सर चालकाचे गाडीवरून नियंत्रण सुटल्याने हा कंटनेर रिक्षावर पलटी झाला आणि रिक्षाचा जागीच चुराडा झाला. त्याचबरोबर हा टँकर झाडावर आदळल्याने झाडही तुटले आहे. तर रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झालाअसून तीन जण जखमी झाले आहेत. रणजीत माणिक जाधव (रा. मुंढवा) असे मृत्यू झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. ‌सोलापूर रस्त्यावर रवीदर्शन समोरील लक्झरी आणि एसटी बसच्या थांब्यावर पहाटे साडेपाचच्या सुमारास हा अपघात झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, अपघात झाल्यानंतर रिक्षाचालकांसह स्थानिकांनी जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची भिती काही नागरिकांकडून व्यक्त केली जात असून सोलापूर रोडवर प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याची माहिती मिळाली आहे.

टॅग्स :Pune Newsaccidentdeath