पुणे : वडार व कांबळे यांनी पटकवला 'एएमएम श्री २०२२ किताब' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune hadapsar bodybuilding competition

पुणे : वडार व कांबळे यांनी पटकवला 'एएमएम श्री २०२२ किताब'

हडपसर : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या येथील अण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या वतीने 'एएमएम श्री २०२२' शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेमध्ये शिवम वडार याने 'एएमएम श्री सिनिअर' - २०२२" तर किरण कांबळे याने 'एएमएम श्री जुनिअर' - २०२२ हा किताब पटकावला. 'एएमएम श्री जुनिअर मेन्स फिजिक - २०२२' चा मान कार्तिक नागवडे ह्या खेळाडूने मिळवीला.

स्पर्धेत मेन्स क्लासिक सिनियर - २०२२ मध्ये शिवम वडार याने प्रथम, किरण कांबळे याने द्वितीय तर सुमित मोरे याने तृतीय क्रमांक पटकावला. मेन्स फिसिक जुनिअर - २०२२ मध्ये कार्तिक नलावडे याने प्रथम, अनुराग वाघमारे याने द्वितीय, तर गणेश गायकवाड याने तृतीय क्रमांक पटकावला. अभिनंदन खन्ना, विशाल कांबळे, तन्मय भोसले यांनी बेस्ट अपकमिंग बॉडी बिल्डर - २०२२ हा सन्मान मिळवला.

मेन्स क्लासिक जुनिअर -२०२२ मध्ये किरण कांबळे याने प्रथम, रंजन धुमाळ याने द्वितीय तर करण शेलार याने तृतीय क्रमांक पटकावला. विवेक जगताप याने बेस्ट पोझर सन्मान मिळवला. प्रा. अनिल मरे, प्रा. विवेक माने यांनी पंच म्हणून काम पाहिले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अजित घुले, प्रा. संजीव पवार, प्रा. सचिनकुमार शाह, डॉ. नामदेव भुजबळ, डॉ. राजेश रसाळ, प्रा. विठ्ठलराव गोरे, डॉ. धीरजकुमार देशमुख, प्रा. सागर भराटे आदी यावेळी उपस्थित होते. राजेंद्र औटे, अमोल गायकवाड, धीरज सोनावणे, श्रीकृष्ण थेटे, अमोल कचरे, विशाल कोलते, आदित्य चव्हाण, आकाश गायकवाड, शिवानी भोसले, प्रा. प्रितम ओव्हाळ यांनी संयोजन केले.