Pune : PMPML कर्मचाऱ्याकडून गैरवर्तवणुक; शिवीगाळ करत नागरिकाला धमकी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Hadapsar bus depot  Employee

Pune : PMPML कर्मचाऱ्याकडून गैरवर्तवणुक; शिवीगाळ करत नागरिकाला धमकी

हडपसर : पुणे सार्वजनिक वाहतूक सेवा पीएमपीएमएल (PMPML) हडपसर गाडीतळ डेपो येथील कर्मचाऱ्याकडून गैरवर्तवणुकीचा प्रकार सायंकाळच्या ८:४५ ते ९: ५२ पर्यंतच्या कालावधीत बस न आल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत होती. हडपसर ते पिंपरी चिंचवड जाणारी २०४ बस येण्यास उशीर झाल्यामुळे त्यासंदर्भात विचारपूस करण्यास गेले असताना. तेथील राजा भोसले कर्मचाऱ्यांने शंका निरसन न होण्याचे कारण देत उत्तर दिले. नागरिकाने पुन्हा विचारपूस करण्यास गेल्या नंतर कर्मचाऱ्याने अपशब्द वापरत शिवीगाळ केली. मारहाण करण्याचा प्रयत्न करत धमकी दिली. हा सर्व प्रकार हा व्हिडिओ स्वरूपात आहे. कर्मचारी हे नशेत असल्याची शंका आहे.

नागरिकांनी करायचं तरी काय समस्या विचारायच्या तरी कोणाला असा प्रश्न उपस्थित झाला आहे. हडपसर गाडीतळ डेपो हे गर्दीचे ठिकाण आहे. अनेक बस येत जात असतात तेथील नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून पुणे महानगरपालिका सार्वजनिक वाहतूक सेवा पीएमपीएमएल (PMPML) चे कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्या कडून योग्य मदत अपेक्षित आहे. पण ह्या प्रकारावरून पीएमपीएमएल हे खाजगी स्वतःच्या मालकीचे असल्या प्रमाणे ते लोकांशी बोलत होते.

शंका दोन वेळेस का विचारली या कारणास्तव शिवीगाळ केली. एकट्यात भेट तुला बघून घेईल अश्या धमक्या देखील दिल्या गेल्या. हे कृत्य अशोभनीय व चुकीचे आहे. ह्यावर लवकरात कारवाई केली गेली पाहिजे. अश्या प्रकारची वर्तवणुक पुन्हा होता कामा नये याची दक्षता देखील घेतली पाहिजे.

Web Title: Pune Hadapsar Bus Depot Pmpml Employee Misbehavior Attempt To Threaten Citizen

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..