Hadapsar Crime : साडेसतरानळी पोलिस चौकीला मिळेना मुहूर्त, गुन्हेगारी, अवैध धंद्यांत वाढ; नागरिकांमधून नाराजी व्यक्त

Spike in Crime and Illegal Activities in Hadapsar : हडपसर येथील साडेसतरानळी परिसरात अवैध धंदे (दारू, मटका, जुगार) आणि गुन्हेगारी (चोरी, दहशत, कोयत्याने हल्ला) मोठ्या प्रमाणात वाढली असून, स्वतंत्र पोलीस चौकी तयार असूनही ती सुरू होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त होत आहे.
Spike in Crime and Illegal Activities in Hadapsar

Spike in Crime and Illegal Activities in Hadapsar

Sakal

Updated on

हडपसर : येथील साडेसतरानळी परिसरात गुन्हेगारी व अवैध धंद्यांचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यासाठी नागरिकांनी येथे स्वतंत्र पोलिस चौकीची मागणी केली आहे. सध्या चौकीसाठीची जागा व त्यावरील लोखंडी खोल्याही तयार आहेत. मात्र, दोन-तीन महिने उलटूनही त्या ठिकाणी अद्याप कामकाज सुरू झालेले नाही. त्यामुळे नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. येथे अवैध दारू धंदे, मटका, जुगार व व्यसनी तरुणांचे प्रमाण अधिक वाढले आहे. यातून चोऱ्या व दहशतीचे प्रकारही घडत असून बाल गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. परिसरातील नागरिकांना त्याचा वारंवार त्रास सहन करावा लागतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com