
Massive Traffic Jam in Pune’s Hadapsar Area: वाहतूक कोंडी ही समस्या तशी तर सर्वच ठिकाणी असते, मात्र त्यालाही काही मर्यादा असते. फार फारतर अर्धा, पाऊनतास वाहतूक कोंडी झालेली आपण ऐकली असले, मात्र हडपसमध्ये तब्बल पाच तास लोक वाहतूक कोंडीत अडकून होते.
हडपसर भागातील मगरपट्टा उड्डाणपूलावर पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास दुभाजकावर भला मोठा कंटेनर अडकला. यामुळे सोलापूर व सासवड पुणे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. सोलापूर महामार्गावरील मांजरी फाटा व सासवड महामार्गावरील गोंधळेनगर ते मगरपट्टा उड्डाणपुलापर्यंत वाहनांची लांब रांग लागली होती. त्यामुळे प्रवाशांना सुमारे पाच तास वाहतूक कोंडीत अडकून पडावं लागलं.
सोलापूर महामार्गावरून नगर महामार्गाकडे निघालेला एक कंटेनर मगरपट्टा उड्डाणपुलावरील चौकात वळण घेत होता. पूलावर अंधार असल्यामुळे वाहनचालकाला दुभाजक न दिसल्याने कंटेनर दुभाजकावर चढला. त्यामुळे शहर व मगरपट्ट्याकडे जाणाऱ्या वाहतुकीला अडथळा निर्माण होवून वाहनांची सुमारे तीन किलोमीटर पर्यंत रांग लागली होती. दरम्यान, वाहतूक पोलिसांनी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास दोन क्रेन लावून अडथळा काढल्यानंतर वाहतूक सुरू झाली.
या वाहतूक कोंडीने दोन्ही पुलांसह पुलाखालील रस्त्यावर वाहनांची मोठी गर्दी झाली होती. शाळा महाविद्यालयीन विद्यार्थी, कामगारांना त्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागला. मांजरी फाटा ते मगरपट्टा हे अंतर पार करण्यासाठी वाहनचालकांना एक तासाच्यावर वेळ लागत होता. पुलाखालील कोंडीमुळे पादचाऱ्यांना कसरत करीत व जीव मुठीत धरून प्रवास करावा लागला.
याबाबत वाहतूक पोलिस निरीक्षक राजेंद्र करणकोट म्हणाले, "पहाटे पुलावर कंटेनर अडकल्याने कोंडी झाली होती. त्याला दोन क्रेन लावून काढावे लागले. त्यासाठी वेळ गेला. दरम्यान, महामार्गावर कोंडी वाढत गेली. ठिकठिकाणी कर्मचारी लावून कोंडी सोडविण्यात आली.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.