
Donald Trump’s Explosive Remarks Against Barack Obama : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे तुरुंगात पाठवू इच्छित असल्याची खळबळजनक बातमी समोर आली आहे. विशेष म्हणजे ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये याचे संकेतही दिले आहेत.
ट्रम्प यांनी एक फोटो पोस्ट केला आहे ज्यामध्ये ओबामा तुरुंगात असल्याचे दाखवले आहे. यापूर्वी ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथवर एक एआय व्हिडिओ देखील शेअर केला होता, ज्यामध्ये एफबीआय ओबामा ट्रम्प यांच्या शेजारी बसलेले असताना त्यांना ताब्यात घेते. ट्रम्प यांनी त्यात असेही लिहिले असते की कोणीही कायद्यापेक्षा मोठा नाही.
ट्रम्प यांच्या सोशल मीडिया पोस्ट आणि एआय व्हिडिओमुळे अमेरिकेत चर्चा उधाण आलं आहे, की ट्रम्प यांनी ओबामांना तुरुंगात पाठवण्याची योजना तयार केली आहे. प्रत्यक्षात, जेव्हा ट्रम्प पहिल्यांदा निवडणूक जिंकले तेव्हा त्यांच्यावर रशियाच्या मदतीने खोटा कट रचल्याचा आरोप करण्यात आला होता, शुक्रवारीच गुप्तचर प्रमुख तुलसी गॅबार्ड यांनी या प्रकरणाबाबत ओबामांविरुद्ध पुरेसे पुरावे गोळा केल्याचा दावा केला होता. आता ट्रम्प यांच्या पोस्टनंतर, असे मानले जात आहे की ते ओबामांवर खटला चालवण्याची परवानगी देऊ शकतात.
ट्रम्प यांनी शेअर केलेल्या एआय व्हिडिओमध्ये माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा ओव्हल ऑफिसमध्ये बसलेले दिसत आहेत, ट्रम्प देखील जवळच बसलेले आहेत. दरम्यान, एफबीआय टीम त्यांना अटक करते. डीपफेक तंत्रज्ञानाने बनवलेल्या या व्हिडिओमध्ये ओबामांच्या हातातील हातकडी देखील दिसत आहे, त्यांना एफबीआय एजंट घेवून जाताना दिसत आहेत अन् ट्रम्प यावर हसत आहेत. तसेच व्हिडिओमध्ये बायडेनसह अनेक डेमोक्रॅटिक नेते असेही म्हणतात की कोणीही कायद्यापेक्षा मोठे नाही. यानंतर, ओबामा नारंगी रंगाच्या कैद्याच्या ड्रेसमध्ये तुरुंगात दिसत आहेत. हा व्हिडिओ वाढत्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
विशेष म्हणजे ट्रम्प यांची पोस्ट गुप्तचर विभागाच्या प्रमुख तुलसी गॅबार्ड यांनी ओबामांविरुद्ध पुरावे असल्याचा दावा केल्यानंतर लगेचच आली आहे. ओबामामच्या उच्च अधिकाऱ्यांनी ट्रम्प यांच्यावर पहिल्यांदा निवडणूक जिंकल्यानंतर रशियाशी संगनमत केल्याचा आरोप केला होता. त्यांनी म्हटले होते की ट्रम्प यांनी हे यासाठी केले जेणेकरून ते मला अध्यक्ष होण्यापासून रोखू शकतील. तुलसी गॅबार्ड यांनी म्हटले आहे की त्या ही कागदपत्रे न्यास विभाग आणि एफबीआयला देण्याची योजना आखत आहेत, जेणेकरून ओबामांवर कारवाई करता येईल.
आतापर्यंत बराक ओबामा किंवा त्यांच्या टीमने या संदर्भात कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तर गॅबार्ड यांनी फॉक्स न्यूजशी बोलताना म्हटले होते की, आमच्याकडे असलेले पुरावे कमी नाहीत. आम्ही १०० हून अधिक कागदपत्रे जारी केली आहेत, ज्यात ओबामांनी निवडणूक जिंकल्यानंतर ट्रम्प यांना देशद्रोही म्हणण्याचा कट कसा रचला याचे पुरावे आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.