Pune Missing Young Girl : प्रियकराला एड्स तरीही त्याच्याशीच लग्न करणार, बेपत्ता तरुणीचा आई अन् भावाला ई-मेल; कुटुंबीयांची पोलिसांत धाव

Fursungi Police : पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात कॉलेजला जाण्यासाठी घरातून बाहेर पडलेली २२ वर्षीय तरुणी बेपत्ता झाली आहे. तरुणी बीएस्सी कॉम्प्युटरचे शिक्षण घेत असून गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे कॉलेजसाठी घराबाहेर पडली होती.
Pune missing girl case

Pune missing girl case

esakal

Updated on: 

पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील एका गावातील कॉलेजला जाण्यासाठी घरातून बाहेर पडलेली २२ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. तरुणी उशिरापर्यंत घरी न परतल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. दरम्यान, तिच्याकडून आई, भाऊ आणि लहान बहिणीला ई-मेल प्राप्त झाल्यानंतर कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. या प्रकरणी फुरसुंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलीस तरुणीचा शोध घेत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com