

Commuters demand urgent repairs before widening of Manjari Khurd road
sakal
मांजरी खुर्द : गेल्या काही वर्षांपसुन या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी होत असतानाही सार्वजनिक बांधकाम विभाग त्याकडे कमालीचे दुर्लक्ष करीत आहे. या रस्त्याच्या रुंदीकरणाची चर्चा सुरू झाल्यापासून साधे खड्डेही बुजवले जात नाहीत. रुंदीकरणाच्या नावाखाली प्रवासी व नागरिकांची केवळ फसवणूक केली जात आहे. त्यामुळे त्यांच्याकडून संताप व्यक्त केला जात असून "रूंदीकरण होईल तेंव्हा होऊद्या आधी डागडूजी करा," अशी जोरदार मागणी केली जात आहे.