हवेली पोलीसांचा जुगार अड्ड्यावर छापा; मुद्देमाल जप्त, 4 जण अटकेत

हवेली पोलीसांचा जुगार अड्ड्यावर छापा; मुद्देमाल जप्त, 4 जण अटकेत

किरकटवाडी: वाढत्या कोरोना रुगणसंख्येच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कडक लॉकडाऊन जाहीर केलेले असताना खडकवासला गावच्या हद्दीत एका शेडमध्ये राजरोसपणे सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर हवेली पोलिसांनी छापा टाकून रोख रकमेसह मोठा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. (Pune Haveli police raid on gambling Items confiscated 4 arrested)

संजय लक्ष्‍मण निम्हण (वय 34,रा. कर्वेनगर, पुणे), सागर बळवंत कोल्हे (वय 34, रा. कोल्हेवाडी, खडकवासला, पुणे), स्वप्नील राजाराम मते (वय 32, रा. खडकवासला, पुणे) व संजय रमेश चव्हाण (वय 24, रा.लमाणवाडी, खडकवासला) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून त्यांच्याकडून 41 हजार रुपये रोख रक्कम, 4 मोबाइल व तीन दुचाकी असा एकूण 2 लाख 67 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांना कोल्हेवाडी, खडकवासला येथील एका हॉटेलच्या मागे शेडमध्ये काही दिवसांपासून जुगार अड्डा सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निरंजन रणवरे, सहाय्यक फौजदार प्रदीप नांदे, पोलीस नाईक किरण बरकाले व पोलीस कॉन्स्टेबल संतोष भापकर यांच्या पथकाने आज दि. 13 मे रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास सदर ठिकाणी छापा टाकला असता जुगार अड्डा सुरू असल्याचे आढळून आले. आरोपींना रोख रक्कम व मुद्देमालासह रंगेहात पकडण्यात आले असून हवेली पोलीस ठाण्याकडून पुढील तपास सुरू आहे.

हवेली पोलीसांचा जुगार अड्ड्यावर छापा; मुद्देमाल जप्त, 4 जण अटकेत
पुणे: कोरोनाच्या भीतीपोटी वृद्धेची आत्महत्या?

शेतात पाठलाग करून पकडले आरोपी

छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकाला पाहून आरोपी मुद्देमाल जागेवर टाकून आजूबाजूला शेतात पळून जाऊ लागले. पोलिसांनी पाठलाग करून सर्व आरोपींना पकडले. पाठलाग करताना शेताच्या बांधावरून घसरल्याने पोलीस नाईक किरण बरकाले यांच्या हाताला दुखापत झाली आहे मात्र त्यांनी पकडलेला आरोपी सोडला नाही.

जुगार अड्ड्याला काही पोलिसांचा छुपा पाठिंबा

मिळालेल्या माहितीनुसार सदर जुगार अड्ड्याला 'काही पोलिसांचा' छुपा पाठिंबा होता. संबंधित पोलिसांची या ठिकाणी नेहमी ये-जा असायची. मात्र या जुगार अड्ड्याला 'अर्थपूर्ण' छुपी परवाणगी देणाऱ्या पोलीसांची नावे समजू शकली नाहीत. याबाबत पोलीस तपासात काय सत्य बाहेर येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

"सलग दोन दिवस अवैध धंद्यांवर कारवाई सुरू आहे. आज मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे जुगार अड्ड्यावर छापा टाकून कारवाई करण्यात आली. हद्दीत कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे सुरू राहणार नाहीत यासाठी यापुढेही कारवाई सुरुच राहणार आहे.नागरिकांना अवैध धंद्यांबाबत काही माहिती मिळाल्यास न घाबरता हवेली पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. तातडीने कारवाई करण्यात येईल."

- सदाशिव शेलार, पोलीस निरीक्षक, हवेली पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com