

Pune High Capacity Mass Transit Route Under Scrutiny Over Public Transport Plans Road Safety and Environmental Impact
sakal
पुणे : पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रस्तावित ३५.९६ किलोमीटर लांबीच्या उच्च क्षमता द्रुतगती वाहतूक मार्गाच्या (एचसीएमटीआर) मूळ उद्देशालाच हरताळ फासला जाण्याची भीती ‘परिसर’ संस्थेने व्यक्त केली आहे. १९८७ च्या विकास आराखड्यात सार्वजनिक वाहतुकीसाठी आरक्षित असलेला हा मार्ग खासगी वाहनांसाठीचा सहापदरी उन्नत रस्ता बनविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आक्षेप संस्थेने घेतला आहे. प्रकल्पात पारदर्शकता ठेवावी, पर्यावरणीय मंजुरी घ्यावी आणि स्वतंत्र रस्ता सुरक्षा परीक्षण करून नागरिकांशी चर्चा करावी, अशी मागणी संस्थेने महापालिका आणि राज्य सरकारकडे केली आहे.