Pune Traffic : वाहतूक कोंडी फोडणाऱ्या 'HCMTR' रस्त्यावरून महापालिकेची भूमिका स्पष्ट; वाढीव खर्चाने निविदा रद्द, पण प्रकल्प कायम

HCMTR Project Status Clarified by PMC : पुण्यातील वाहतूक कोंडीवरील उपाय 'एचसीएमटीआर' (HCMTR) हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प रद्द केलेला नाही, फक्त वाढीव खर्चामुळे टप्प्याटप्प्याने करण्यात येईल, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.
The crucial HCMTR ring road project for traffic relief is not cancelled, but will be phased due to funding

The crucial HCMTR ring road project for traffic relief is not cancelled, but will be phased due to funding

Sakal

Updated on

पुणे : शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेकडून वर्तुळाकृती उच्च द्रुतगती उन्नत महामार्ग (एचसीएमटीआर) प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यासाठी येणारा खर्च मोठा आहे. त्यामुळे भविष्यात हा प्रकल्प पैशांच्या उपलब्धतेनुसार व वेगवेगळ्या भागांत टप्प्याटप्प्याने करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. मात्र, हा प्रकल्प रद्द केलेला नाही, असे महापालिका प्रशासनाने गुरुवारी स्पष्ट केले. महापालिकेने हा प्रकल्प रद्द केल्याचे सर्वोच्च न्यायालयात सांगितल्याचा दावा करणारे पत्र पर्यावरणप्रेमी संस्थांनी दिल्यानंतर महापालिकेने यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com