
पुणे : वारज्यातील गणपती माथा भागातील कै. पृथक बराटे दवाखान्यात सध्या अनागोंदी कारभाराचा कळस गाठल्याचे चित्र आहे. गैरसोयी आणि कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे रुग्णांना तसेच नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. दवाखान्याच्या ड्रेसिंग रूमची अवस्था दयनीय आहे.