
Pune Health News
Sakal
पुणे : ‘‘वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सततचा अभ्यासाचा ताण, स्पर्धा परीक्षा व वैयक्तिक संघर्ष यामुळे मानसिक तणाव येऊ शकतो. अशावेळी योग्य वेळेवर आधार, समुपदेशन आणि संवाद मिळविण्यासाठी बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात छात्रमानस कक्ष ही योजना राबविण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी मानसिक समस्येविषयी कुठलीही भीती किंवा लाज न बाळगता त्यावर सल्ला घेण्याकरिता उपलब्ध सेवांचा लाभ घेण्याकरिता पुढे यावे,’’ असे आवाहन मनोविकृतिशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. निशिकांत थोरात यांनी केले.