
Pune Health
Sakal
कोथरूड : कोथरूड आणि बावधन परिसरातील उजवी व डावी भुसारी कॉलनी, मोकाटेनगर या भागांतील नागरिकांना गेल्या तीन दिवस उलट्या, जुलाब आणि पोटदुखीचा त्रास होत आहे. यामागे नेमके कारण काय, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पाण्याचे नमुने तपासणीसाठी दिले असले तरी तपासणी अहवाल मिळण्यासाठी ७२ तास लागतात. त्यामुळे दूषित पाण्यामुळेच नागरिक आजारी पडले आहेत असे लगेच म्हणता येणार नसल्याचे मत आरोग्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.