
पुणे : सध्याच्या पावसाळी वातावरणामुळे सध्या शहरात हंगामी फ्लू असलेल्या विषाणुजन्य आजारांनी डोके वर काढले आहे. यामध्ये दरवर्षीप्रमाणे ‘एच १ एन १’ (स्वाइन फ्लू) सह ‘एच ३ एन २’ च्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. मात्र, त्यामुळे कडकडून ताप भरत असल्याचे वगळता इतर लक्षणे सौम्य स्वरूपाची आहेत. त्यामुळे रुग्णालयात भरती होण्याचे प्रमाण मात्र वाढलेले नाही. ही लक्षणे फ्लूवीरच्या गोळ्या व मुलांना फ्लूवीर हे विषाणूविरोधी औषध दिल्यानंतर लक्षणे कमी होत असल्याची माहिती खासगी रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर देतात.