
Pune Health News
Sakal
पुणे : शहरात गेल्या काही दिवसांपासून विषाणुजन्य आजारांचा जोर वाढलेला दिसून येत आहे. ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी आणि थकवा अशी लक्षणे मोठ्या प्रमाणात रुग्णांमध्ये दिसत आहेत. पावसाळी वातावरणामुळे हवेत आर्द्रता वाढल्याने, उन्हाचा अभाव यामुळे विषाणूंचा प्रादुर्भाव होण्यास पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे दवाखाने व रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या वाढलेली आहे.