Pune Temperature : पुणेकरांना उन्हाच्या झळा! तापमानाचा पारा आणखी वाढणार; जाणून घ्या पुढील चार दिवस कसे असेल हवामान?

Pune Weather : माहितीनुसार पुढील काही दिवस मध्य महाराष्ट्रात उष्ण आणि दमट वातावरणाचा इशारा देण्यात आला आहे. शहर आणि परिसरात कमाल तापमान ४० ते ४२ अंश सेल्सियसदरम्यान राहण्याची शक्यता आहे.
Pune temperature
Pune temperatureesakal
Updated on

राज्यातील तापमान वाढले असून नागरिक त्यात होरपळून निघत आहेत. पुणे शहर आणि परिसरात उन्हाच्या तीव्र झळा वाढल्या असून वाढलेला उष्मा असे वातावरण आणखी काही दिवस सहन करावे लागणार आहे. सध्या उष्णतेच्या लाटेसदृश स्थिती निर्माण झाली असून, पुढील चार ते पाच दिवस कमाल तापमान ४० ते ४२ अंश सेल्सियस राहणार आहे. २२ एप्रिलनंतर तापमानात किंचित घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com