
Pune Rain orange Alert : पुणे जिल्ह्यात मागील मान्सूनने हजेरी लावली असून काही भागांत ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने शेतीचे खूप मोठे नुकसान झाले तर जनजीवन विस्कळीत झाले. दरम्यान पुणे जिल्ह्यासाठी आज सुद्धा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आल्याची जिल्हा प्रशासनाने माहिती दिली आहे. तसेच अहिल्यानगर, कोल्हापूर, मुंबई, मुंबई उपनगर, पालघर, परभणी, पुणे, सांगली, सातारा, ठाणे या जिल्ह्यात पुढील ३ तासांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.