

Heavy Rainfall Continues in Pune City and Surroundings : मॉन्सूनच्या पावसाने राज्यात सर्वदूर हजेरी लावली आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून पाऊस सुरू असून गुरुवारी रात्रीपासून संततधार सुरु आहे. शुक्रवारी सकाळीही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. यामुळे धरणांतील पाणीसाठा वाढला असून पुणेकरांना पाणीटंचाईपासून तूर्तास दिलासा मिळाला आहे. दरम्यान पुण्यात पावासाचा जोर वाढणार असून हवामान विभागाने पुण्याच्या घाटमाथ्यावर पुढील ३ दिवसांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे.