कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा वाढला असून पुणे, सातारा रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. घाटमाथ्यावर जोरदार पाऊस सुरु असून पुणे शहर आणि परिसरातही सकाळपासून पाऊस जनजीवन विस्कळित झाले आहे. दरम्यान पावसाचा जोर आणखी वाढणार असून हवामान विभागाने पुढील तीन तास पुण्याला रेड अलर्ट जारी केला आहे.