Pune Farmers Flood Loss: सुमारे २२ हजार हेकट्टर क्षेत्र बाधित; जिल्ह्याचा नुकसानीचा अंतिम अहवाल तयार, ३४ कोटींची मागणी
Heavy Rain Damage: सप्टेंबरमधील अतिवृष्टीत पुणे जिल्ह्यात तब्बल ५२ हजार शेतकऱ्यांची शेती बाधित झाली असून २१ हजार ९९३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. मदतीचा अंतिम निर्णय दिवाळीपूर्वी मिळेल का, याकडे सर्वांचे लक्ष.
पुणे : जिल्ह्यात सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा अंतिम अहवाल तयार झाला असून, नुकसानीचा आकडा २१ हजार ९९३ हेक्टरवर पोहोचला आहे. शेतीच्या झालेल्या नुकसानीसाठी ३४ कोटी ६१ लाख ६३ हजारांची आवश्यकता आहे.