

Pune Rains: Trees Collapse on JM Road, Khadakwasla Dam Discharge Increased
esakal
पुणे शहरासह खडकवासला धरण परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे बुधवारी पहाटे शहरात अनेक ठिकाणी परिणाम दिसून आला. एका बाजूला शहरातील विविध भागांत झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या, तर दुसऱ्या बाजूला खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने धरणातून टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला. त्यामुळे मुठा नदीकाठच्या सखल भागांसह सिंहगड रस्त्यावरील एकतानगर परिसरात पाणी शिरल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.