Pune Rain: पुणेकरांनो सावध! खडकवासल्यातून पाणी सोडण्याचा वेग वाढला, प्रशासनाचा अलर्ट! रात्रीपासून पावसाचा जोर कायम!

Heavy Rain Continues in Pune as Khadakwasla Dam Discharge Rises and Reservoirs Reach Full Capacity : पुण्यात मुसळधार पाऊस कायम असून खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे, तर प्रमुख धरणे भरल्याने प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
Pune Rain Fury: Khadakwasla Dam Discharge Increased Amid Heavy Downpour

Pune Rain Fury: Khadakwasla Dam Discharge Increased Amid Heavy Downpour

esakal

Updated on

पुणे : पुणे शहर व जिल्ह्यात रात्रीपासून पावसाचा जोर कायम आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने प्रमुख धरणे भरली आहेत. खडकवासला धरणातून मुठा नदीत सुमारे ९००० क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. मुठा नदीकाठच्या रहिवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगडसह अनेक भागांत मुसळधार पाऊस आहे. IMD ने ऑरेंज अलर्ट जारी केला असून काही ठिकाणी शाळा-महाविद्यालये बंद. विदर्भ, मध्य महाराष्ट्रातही पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com