esakal | पुणे: शहराला पावसानं तासभर झोडपलं; घरांमध्ये शिरलं पाणी
sakal

बोलून बातमी शोधा

Heavy Rain in Pune

पुणे: शहराला पावसानं तासभर झोडपलं; घरांमध्ये शिरलं पाणी

sakal_logo
By
सुधीर काकडे

पुण्यात आज पुन्हा एकदा जोरदार पाऊस झाली. अनेक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस झाला असून, रस्त्यांवर पाणी साचलेलं पाहायला मिळालं. हवामान विभागाकडून कालच राज्यभारत जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार आज पुण्याती बहुतांश ठिकाणी पाऊस झाला आहे.

पुण्यातील कात्रज, कोंढवा, स्वारगेट, गोकुळ नगर, साई नगर, भारती विद्यापीठ भागांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे.तर केशव नगर, मुंढवा, कोरेगाव पार्क, खराडी आणि नगररोड भागांमध्ये जोरदार पाऊस झाला. शहरातील अनेक भागांत काळेकुट्ट आभाळ दाटून आलं होतं, तसंच बहुतांश भागात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे सर्वच रस्त्यावरील वाहनांचा वेग मंदावला होता. भाजीविक्रेत्यांसह खरेदीदार आणि चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली होती. आजच्या पावसाने देखील अशी परिस्थिती निर्माण होईल याची शक्यता नाकारता येत नाही.

धानोरीमध्ये अनेक घरांमध्ये पाणी शिरले

धानोरीमध्ये अनेक घरांमध्ये पाणी शिरले

धानोरीमध्ये घरात पाणी

मुसळधार पावसामुळे विश्रांतवाडी, धानोरी परिसरात रस्त्यारस्त्यावर पाणी साचले असून, पावसामुळे वाहनचालकांना वाहन चालवणे अवघड झाले आहे. गोकूळनगर येथे घरात, सोसायटींमध्ये पाणी शिरले आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरले असून त्यांना मदतीची गरज आहे, त्यामुळे मनपा अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष घालावे अशी मागणी मनसे कार्यकर्ते गणेश संजय पाटील यांनी केली आहे.

वडगावशेरीमध्ये सोसायटीत पाणी

रामवाडी: सोसाट्याचा वारा आणि विजेचा कडकडाट सह पावसाने धुवाधार बॅटिंग केली. अनेक रस्ते जलमय झाले होते. पाण्यातून अंदाज घेत दुचाकी चालवताना दुचाकी स्वारांची चांगलीच तारांबळ उडाली. संथ गतीने वाहने जात असल्याने रस्त्यावर वाहनांची लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सालाबादप्रमाणे यावर्षीही अनेक घरांमध्ये आणि सोसायट्या मध्ये पावसाचे पाणी घुसल्याने पार्किंग मधील वाहनांचे नुकसान झाले.

पुणे शहरात आज संध्याकाळपासून होत असलेल्या मुसळधार पावसाने येरवडा, टिंगरेनगर, बिबवेवाडी येथे पाणी साचले आहे. वाकडेवाडी, ताडीवाला रोड, वाडिया कॉलेज, येरवडा येथे ४ ठिकाणी झाड पडल्याच्या घटना घडल्या आहेत. तसंच ठीकठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहतूक कोंडी झाली.

हेही वाचा: Monsoon Alert: उद्या राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता

हवामान विभागातील शास्त्रज्ञ के.एस. होसळीकर यांनी कालच राज्यात जोरदार पाऊस होणार असल्याने सतर्कतेचा इशारा दिला होता. "फार क्वचित वेळा असे चित्र दिसते कि संपूर्ण महाराष्ट्रात गडगडाट सहित पाऊस पडण्याची शक्यता.." अशी माहिती के.एस. होसळीकर यांनी दिली होती.

loading image
go to top