Pune Rain Alert : पुण्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरुच, सिंहगडावर दरड कोसळली; पर्यटकांना सतर्कतेच्या सूचना

Pune Weather Update : प्रशासनाने पर्यटकांना सतर्क राहण्याचे आणि धोकादायक भागांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. पुण्यातील रास्तापेठेत झाड कोसळून काही वाहनांचे नुकसान झाले. हवामान विभागाने पुणे व रायगड घाटमाथ्यावर रेड अलर्ट जारी केला आहे.
Pune Rain Alert

Landslide near the entrance steps of Sinhagad Fort

esakal

Updated on

Heavy Rainfall Continues in Pune and Ghat Regions : पुणे शहर आणि जिल्ह्यातील घाटमाथ्यावर मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. शहरात अनेक ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या आहेत. अशाच आता शुक्रवारी सकाळी सिंहगडावर मुख्य दरवाजाजवळ दरड कोसळल्याची घटना समोर आली आहे. प्रशासनाने पर्यटकांना किल्ल्यावर जाताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या दरडीत तीन ते चार मोठे दगड पायऱ्यांवर पडल्याची घटना उघडकीस आली. सकाळी वनसंरक्षण समितीच्या सुरक्षारक्षकांच्या पाहणी दरम्यान ही बाब निदर्शनास आली. त्यानंतर घटनास्थळाचा व्हिडिओ तयार करण्यात आला. वनसंरक्षण समितीचे अध्यक्ष पांडुरंग सुपेकर यांनी याबाबतची माहिती दिली. दरड नेमकी कोणत्या वेळी कोसळली, याची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नसली तरी शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.

दरम्यान, चार दिवसांपूर्वी सिंहगड घाट रस्त्यावरही किरकोळ दरड कोसळली होती. रस्त्यावर माती व दगड आल्याने काही काळ अडथळा निर्माण झाला होता. मात्र, संबंधित यंत्रणेला माहिती मिळताच जेसीबीच्या साह्याने माती व दगड हटवून रस्ता तातडीने वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. असे ही सुपेकर यांनी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com