Pune Heavy Rain: मेघगर्जनेसह पावसाची जोरदार हजेरी; पुणेकरांची तारांबळ, ठिकठिकाणी रस्त्यावर साचले पाणी
Weather Update: पुण्यात जोरदार पावसाने शहर आणि उपनगर परिसरात अनेक ठिकाणी पाणी साचले. मेघगर्जनेसह वादळी पावसामुळे पुणेकरांना वाहतूक आणि जीवनात अडथळा अनुभवावा लागला.
पुणे : शहर आणि उपनगर परिसरात गेल्या दोन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने रविवारी (ता. २६) जोरदार हजेरी लावली. मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह सुमारे तीन तास पडलेल्या पावसाने पुणेकरांची चांगलीच दाणादाण उडाली.