esakal | Pune: वादळी पाऊस व वाऱ्यामुळे झाडे पडून नुकसान
sakal

बोलून बातमी शोधा

वाऱ्यामुळे झाडे पडून नुकसान

सहकारनगर : वादळी पाऊस व वाऱ्यामुळे झाडे पडून नुकसान

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सहकारनगर : सहकारनगर परिसरातील  तुळशीबागवाले कॉलनी, दशभुजा गणेश मंदिर,शिवदर्शन,राजीव गांधी ई लर्निंग स्कूल चौक,पद्मावती इ भागात ठिकठिकाणी झाडे पडून मोठे नुकसान होऊन वाहतूकोंडी निर्माण झाली. सहकारनगर भागातील पडलेली  झाडे व फांद्या हटविण्यासाठी कात्रज व जनता वसाहत अग्निशामक दलाचे जवान झाडांच्या फांद्या तोडून रस्ता मोकळा करण्याचे काम करीत आहेत.

यावेळी स्थानिक नागरीक ही जवानांना मदत करीत रस्ता मोकळा करण्याचे काम करीत होते.यावेळी फारुख शेख (शाहू वसाहत,लक्ष्मीनगर ) म्हणाले, सहकारनगर तुळशीबागवाले कॉलनी, धोमकर पथ ,दशभुजा गणपती मार्ग या भागात रस्त्यावर झाडे व फांद्या पडून नुकसान झाले आहे .रस्त्यावर पावसाळी लाईन तुंबून रस्त्यावर पाणीचं पाणी झाले आहे. पावसाळ्यापूर्वी करायची कामे झाली नसल्याने चेंबर तुंबून पाणी रस्त्यावर वाहत असते.आणि वारंवार झाडांच्या फांद्या छाटून द्यावा अशी वारंवार मागणी करून ही कामे केली नसल्याचा आरोप सहकारनगर भागातील  नागरिक करीत आहेत.

हेही वाचा: इंदापूर : गुरांची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

यावेळी श्रीधर सुभेदार (वय.सहकारनगर, गुरुदीप सोसायटी) म्हणाले, मी दोन दिवसांपूर्वी पनवेल वरून याठिकाणी रस्त्याच्या बाजूला चार चाकी गाडी उभी केली होती मात्र सायंकाळी पाचच्या सुमारास मुसळधार वाऱ्यासाहित आलेल्या पावसामुळे मुळासहित झाड माझ्या गाडीवर कोसल्याने गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.नशीब गाडीत कोणी नव्हते मात्र गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.

यावेळी प्रज्ञा पोतदार (सहकारनगर-धनकवडी सहाय्यक आयुक्त मनपा)म्हणाल्या, सहकारनगर भागातील अंतर्गत रस्त्यावर वादळी वाऱ्यामुळे रस्त्यावरील व सोसाट्याच्यामधील झाडे पडली आहेत.मनपाचे संबंधित कर्मचारी नुकसान झालेल्या परिसरात झाडांच्या फांद्या हटविण्याचे काम करीत आहेत.

loading image
go to top