Pune Rain Update : पुण्यात मुसळधार पावसाची शतकी खेळी; चिंचवडमध्ये विक्रमी २०६ मिमी पाऊस; पवना धरणात ४० टक्के पाणीसाठा

Pimpri Chinchwad Rainfall : पुणे शहरात १०८ मिमी पाऊस पडून तो तिसऱ्या क्रमांकाचा उच्चांक ठरला. धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होऊन पाणीपातळी वाढली. प्रशासनाने निचांकी भागात पाणी साचण्याचा इशारा देत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले.
Heavy rainfall inundates roads and residential areas in Pimpri Chinchwad

Heavy rainfall inundates roads and residential areas in Pimpri Chinchwad

Updated on

एक महिना उशिरा आलेल्या पावसाने जून महिन्यातील कमतरता जुलैमध्ये भरून काढण्याचा निर्धार केल्यासारखे दिसते आहे. गेल्या २४ तासांत पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरासह धरण क्षेत्रात मुसळधार पावसाने शतकी खेळी केली. चिंचवडमध्ये विक्रमी २०६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या दमदार पावसामुळे पवना धरणात ४० टक्के पाणीसाठा झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com