
Pune Rain Update: पुणे आणि परिसरात मंगळवारी मुसळधार पावसाने पुण्याची दाणादाण उडवली. काल झालेल्या पावसामुळे रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आल्याचे चित्र निर्माण झाले होते. पण शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने महापालिकेला याला जबाबदार धरत अनोखे आंदोलन केले आहे. या पठ्ठ्याने चक्क रस्त्यावर साचलेल्या पाण्यात होडी आणून ठेवली. अनोख्या आंदोलनाची पुण्यात जोरदार चर्चा सुरु आहे.