

Pune
esakal
पुणे: शहरात सलग दोन दिवस सुरू असलेल्या पावसामुळे पुणेकर अक्षरशः त्रस्त असताना महापालिकेची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा मात्र गायब झाल्याचे चित्र होते. रस्त्यांवर असंख्य ठिकाणी पाणी साठण्याचे, पावसाळी व सांडपाणी वाहिन्या फुटून व ओढ्या-नाल्यांमधील पाणी सोसायट्या, वस्त्यांमध्ये शिरण्याच्या घटना घडूनही यंत्रणेला नागरिकांना दिलासा देता आला नाही. विशेषतः आषाढी वारीनिमित्त लाखो वारकऱ्यांचा पुण्यात मुक्काम असतानाही पाण्याचा निचरा करण्यात सलग तिसऱ्या दिवशीही महापालिकेला सपेशल अपयश आले आहे.