
पुणे आणि उपनगरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आज सकाळी अनेक भागांत पावसानी हजेरी लावल्यानंतर आता दुपारी ढगांच्या गडगडासह जोरदार पावसाने हजेरी लावली अचानक पावसाच्या सरी बरसल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. आज सकाळपासूनच पुणे शहरात आणि उपनगरात ढगाळ वातावरण झाले होते. काही ठिकाणी तुरळक सरीही कोसळल्या, दरम्यान दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास पुण्यात जोरदार पाऊस पडला.