
पुणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचे सत्र शहर आणि जिल्ह्यात कायम असून अनेक ठिकाणी उच्चांकी पावसाची नोंद झाली आहे. शहरात पावसाचे प्रमाण कमी असले, तरी जिल्ह्यातील दौंड, इंदापूर, बारामती तालुक्याला अतिवृष्टीने झोडपले. गेल्या चार दिवसांत शहर आणि परिसरातील पावसाची तीव्रता वाढली मात्र रविवारी अतिवृष्टीचा कहर झाला. शहर आणि परिसरात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. हवामान विभागाने आजही ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.