टेनिस चेंडूनं दिलं बगळ्याला जीवनदान, वाचा अवलियानं काय लढवली शक्कल?

विष्णु गरुड यांनी रात्री साडेनऊ वाजता १०१ ला फोन करुन कळविले असता त्यांनी सांगितले कि रात्री आम्ही अशी कामं करत नाही.
Save Life
Save LifeSakal

धायरी : सिंहगड रस्त्यावरील वडगाव बुद्रुक येथील पांउजाई मंदिरा शेजारील पिंपळाच्या झाडावर रस्त्यापासून सुमारे तीस फुट उंचीवर एक बगळा (Heron) पतंगाच्या मांज्यामध्ये शनिवारी रात्री नऊ वाजता अडकल्याचे विष्णु गरुड यांना राहुल अष्टेकर यांनी सांगितले. (Save Life)

विष्णु गरुड यांनी रात्री साडेनऊ वाजता १०१ ला फोन करुन कळविले असता त्यांनी सांगितले कि रात्री आम्ही अशी कामं करत नाही. त्यानंतर लगेचच कात्रज येथील सर्पोद्यानला फोन केला त्यांनी हि सांगितले ऊद्या सकाळी फोन करा. हे सर्व फोन करत असताना लक्ष सगळे बगळ्याकडे होते, बगळा सुटण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत होता.

Save Life
शरद पवारांनी शब्द दिलाय; कामावर या! कृती समितीचे ST कर्मचाऱ्यांना आवाहन

सकाळचे पत्रकार विठ्ठल तांबे यांना फोन करून वडगावमधील सर्पमित्र प्रविण उभे यांना ताबडतोब बोलवुन घेतले‌ त्यांनी प्रत्यक्षात पाहणी करुन सुतळि व टेनिस चेंडु आणायला सांगितले विष्णु गरुड यांनी टेनिस चेंडु दिला. विशाल घुले ने दोन सुतळी बंडल आणले .चेंडुला छिद्र पाडून चेंडुला सुतळि बांधलि जमिनीवरून सर्पमित्र प्रविण उभे यांनी तीस फुटांवर सदर चेंडु सुतळि सह फेकला अखेर ४५ मिनिटांच्या अथक परिश्रमानंतर रात्री सव्वा दहा वाजता बगळ्याची सुटका झाली. बगळा झाडावरुन खाली आला.

त्याला विशाल घुले याने हातात घेऊन पाणी पाजले. पुणे जिल्हा वन्यजीव संरक्षण व सर्प मित्र असोसिएशन चे सदस्य प्रविण उभे, गौरव पवार, वडगाव बुद्रुक मधील श्वान प्रेमी विशाल घुले, कार्यकर्ते राहुल अष्टेकर, संभाजी ढवळे, विष्णु गरुड यांनी परीश्रम घेतले. विशेषतः प्रविण उभे यांनी कल्पकतेने सुतळिचा व चेंडुचा खुबिने वापर करून बगळ्याचे प्राण वाचविले. उभे पुढे म्हणाले की नागरिकांनी अश्या काही प्राण्याच्या व पक्षांच्या मदतीसाठी तात्काळ संपर्क करावा..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com