12 Th Result Pune : बारावी उत्तीर्णांमध्ये मुलांची संख्या मोठी; ग्रामीण भागातील ५६ हजार विद्यार्थी उत्तीर्ण

जिल्ह्यातून सर्वाधिक ९ हजार ९९० विद्यार्थी हे हवेली तालुक्यातून उत्तीर्ण झाले असून, सर्वात कमी वेल्हे तालुक्यातील केवळ ५०१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
12th
12thsakal

पुणे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या (एच.एस.सी. बोर्ड) वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील एकूण ५५ हजार ७८८ विद्यार्थ्यांनी बाजी मारली. ग्रामीण भागातून उत्तीर्ण झालेल्या एकूण विद्यार्थ्यांमध्ये २९ हजार ८७६ मुलांचा; तर २५ हजार ९१२ मुलींचा समावेश आहे. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये कला, वाणिज्य, विज्ञान आणि व्यावसायिक अभ्यासक्रम या शाखेतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

12th
Mumbai : यंदा पावसाळ्यात ५२ दिवस भरतीचे प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

जिल्ह्यातून सर्वाधिक ९ हजार ९९० विद्यार्थी हे हवेली तालुक्यातून उत्तीर्ण झाले असून, सर्वात कमी वेल्हे तालुक्यातील केवळ ५०१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील मिळून एकूण १ लाख ३१ हजार ८१५ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती.

12th
Pune Fire: टिंबर मार्केटमध्ये आग आटोक्यात नाहीच, ४० गाड्या आणि १४० जवानांचे शर्थीचे प्रयत्न सुरूच

नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये ७० हजार २४४ मुले आणि ६१ हजार ५७१ मुलींचा समावेश होता, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com