Baramati : बारामतीच्या टीसीचे दोन खेळाडू भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Baramati

Baramati : बारामतीच्या टीसीचे दोन खेळाडू भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करणार

बारामती : हिमाचल प्रदेशातील सोलन येथील महाराजा अग्रसेन विद्यापीठ, येथे झालेल्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय कॉर्फबोल स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने रजत पदक प्राप्त केले. या संघातील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाचा खेळाडू प्रणव पोमणे याची पटाया (थायलंड) येथे होणा-या आय.के.एफ. आशिया ओशिएनिया कॉर्फबॉल स्पर्धेसाठी भारताच्या संघात निवड झाली आहे.

राष्ट्रीय स्पर्धेतून भारतीय संघाच्या शिबिरासाठी देशभरातून 30 खेळाडूंची निवड करण्यात आली होती. भारतीय संघाचे प्रशिक्षण शिबीर दोन महिन्यांपासून जालंधर व रोहतक येथे झाले. या प्रशिक्षण शिबिरातून अंतिम भारतीय संघ निवडण्यात आला. त्यात प्रणव याची निवड झाली. मागील चार वर्षांपासून प्रणव कॉर्फबॉल खेळाचा सराव करीत असून तो सलगपणे राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करीत आहे.

या शिवाय डेहराडून (उत्तराखंड) येथे झालेल्या राष्ट्रीय कराटे प्रशिक्षण शिबिरातून मंथन भोकरे या महाविद्यालयाच्या खेळाडूची श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे होणा-या दक्षिण आशियाई कराटे स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. मं थन हा मागील काही वर्षांपासून कराटे खेळाचे प्रशिक्षण घेत असून कठोर मेहनतीच्या जोरावर तो सातत्याने राष्ट्रीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करीत आहे.

प्रणव पोमणे व मंथन भोकरे तसेच डॉ.गौतम जाधव व अशोक देवकर या प्रशिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष जवाहर वाघोलीकर, सचिव मिलिंद वाघोलीकर, प्राचार्य डॉ.चंद्रशेखर मुरूमकर यांनी अभिनंनद केले आहे.

टॅग्स :Pune NewsBaramatisports