
Pune Accident: शेरे (ता.मुळशी) येथे चारचाकी गाडीने बेदरकारपणे रस्त्याच्याकडेने चालणाऱ्या तीन शाळकरी मुलांना उडवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलांना उडवून कारचालक गाडीसह पळून गेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तिघेही जखमी झाले असून एकाला गंभीर दुखापत झाली आहे.
हिट अॅण्ड रनच्या या घटनेत प्रेम साहेबराव चव्हाण (वय 13, इयत्ता 7 वी), कार्तिक रामेश्वर मावकर (वय 14, इयत्ता 8 वी) आणि सम्यक प्रमोद चव्हाण (वय 14, इयत्ता 8 वी) (सर्व रा.अकोले ता.मुळशी) अशी जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत.