Pune Accident : नवीन कात्रज बोगद्याजवळ भरधाव दुचाकीची धडक; निष्पाप तरुणाचा बळी, धडक देणारा फरार
Fatal Hit-and-Run in Pune : पुण्यातील नवीन कात्रज बोगद्याजवळ भरधाव दुचाकीने धडक दिल्याने दीपक जगन्नाथ हिरगुडे (वय २५) या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून, धडक देणारा अनोळखी दुचाकीचालक घटनास्थळावरून पसार झाल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.