PMC Hoarding Fee : होर्डिंग शुल्क दरवाढीचा ठराव शासनाकडून रद्द; महापालिकेला मोठा झटका!

Government Decision : पुणे महापालिकेच्या होर्डिंग शुल्कवाढीचा २०२२ चा ठराव शासनाने रद्द केला असून महापालिकेला पुन्हा जुन्या दरानेच १११ रुपये प्रति चौ.फु. शुल्क आकारावे लागणार आहे. नवीन दर निश्चित होईपर्यंत सर्व परवान्यांना स्थगिती देण्यात आली आहे.
State government cancels PMC’s 2022 hoarding fee hike

State government cancels PMC’s 2022 hoarding fee hike

Sakal

Updated on

पुणे : पुणे महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाने २०२२ मध्ये होर्डिंग शुल्क निश्‍चिती करून उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न सुरू केले होते. पण राज्य सरकारने महापालिकेचा हा ठराव रद्द केल्याने महापालिकेला झटका बसला आहे. पुढील १५ दिवसात होर्डिंगसाठीचे शुल्क निश्‍चित करावे लागणार आहेत. दरम्यान, हे दर निश्‍चित होईपर्यंत नवीन परवाने देण्यावर स्थगिती आलेली आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com