

Accident At Royal Farm On Koregaon Park Mundhwa Road
Esakal
महाराष्ट्रासह देशभरात मोठ्या उत्साहत होळी साजरी केली जात आहे. अनेक ठिकाणी होळीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेय. दरम्यान पुण्यात होळीच्या कार्यक्रमाला गालबोट लागलं आहे. कोरेगाव पार्क मुंढवा रोडवर एका होळीच्या कार्यक्रमात लाईटचे गर्डर पडून अनेकजण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. यातील जखमींना रुग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. एकाची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येतंय.