Pune : बिलासाठी मृतदेह ८ तास ठेवावा लागला रुग्णालयात, पूना हॉस्पिटलमधला धक्कादायक प्रकार

Pune News : रुग्णालयात उपचारावेळी मध्यरात्री मृत्यू झालेल्या रुग्णाचा मृतदेह बिलिंग प्रक्रियेमुळं तब्बल ८ तास रोखून ठेवल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय. या प्रकरणी तक्रार दाखल करून कारवाईची मागणी करण्यात आलीय.
Private hospital
Private hospitalESakal
Updated on

रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर बिलासाठी मृतदेह तब्बल ८ तास अडवून ठेवल्याची धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आलीय. पूना हॉस्पिटलमध्ये शहरी गरीब योजनेंतर्गत उपचार घेणाऱ्या रुग्णाचा शुक्रवारी पहाटे दीडच्या सुमारास मृत्यू झाला होता. पण या योजनेंतर्गत बिल सकाळी साडे आठ नंतर तयार होईल असं सांगत मृतदेह देण्यास नकार दिला गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी साडे नऊ वाजता मृतदेह ताब्यात देण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com