

pune-hotels-commercial-lpg-shortage-nrai-meeting-collector-jitendra-dudi-VSW03
sakal
पुणे ः शहरातील हॉटेल व्यवसायांना होत असलेल्या अपुऱ्या एलपीजी गॅसच्या पुरवठ्याबाबत नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया (एनआरएआय)च्या पुणे विभागाने जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची भेट घेऊन तातडीने गॅस पुरवठा सुरळीत करण्याची प्रमुख मागणी केली आहे. या संदर्भात सादर केलेल्या निवेदनात रेस्टॉरंट उद्योग सध्या अस्तित्वाच्या संकटाला सामोरे जात असल्याचे नमूद करण्यात आले आहे.