
कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून ‘वर्क फ्रॉम’मुळे आयटी कंपन्या बंद होत्या. त्यामुळे या कंपन्यांवर आधारित असलेले हॉटेल व्यावसायिक अडचणीत सापडले.
पुणे : हॉटेल व्यावसायिकांना ग्राहकांची प्रतीक्षा
पुणे - कोरोनामुळे (Corona) गेल्या दोन वर्षांपासून ‘वर्क फ्रॉम’मुळे (Work From Home) आयटी कंपन्या (IT Company) बंद होत्या. त्यामुळे या कंपन्यांवर आधारित असलेले हॉटेल व्यावसायिक (Hotel Business) अडचणीत सापडले. सध्या परिस्थितीत सुरळीत झाली असली, तरी या कंपन्या पूर्ण क्षमतेने सुरु झाल्या नाहीत. त्यामुळे ग्राहकांची संख्या कमी असून, अद्यापही व्यवसायाला आर्थिक उभारी मिळत नसल्याचे हॉटेल चालकांनी सांगितले.
कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर परिस्थिती पूर्ववत आली. त्यामुळे आयटी कंपन्या सुरु होण्याचा अंदाज होता. मात्र, काही दिवसांनंतर कोरोनाची दुसरी लाट आली. त्यामुळे कंपन्या सुरु होण्याची आशा मावळली.
यामुळे व्यवसाय बंद करण्याचा विचारही मनात आला. परंतु, त्यानंतर परिस्थितीत हळूहळू पूर्वपदावर आली. काही प्रमाणात व्यवसाय सुरु झाला. मात्र, पूर्वी सारखे ग्राहक नसल्याने पुरेसा धंदा होत नाही.
कामगारांचा पगार निघत असला, तरी मासिक भाडे भरण्यासाठी काही वेळा पैसे खिशातून भरावे असल्याचे खराडी येथील हेमंत बेशनोई यांनी सांगितले.
हेही वाचा: मेट्रोने २२ हजार जणांचा प्रवास; एका दिवसात कमावले....
कोरोनापूर्वी आयटी कंपन्यांच्या परिसरात हॉटेल व्यवसाय व्यवस्थित सुरू होता. मात्र, कोरोनामुळे सर्वकाही बंद झाले. आता हॉटेलचे भाडेही परवडत नाही. त्यामुळे अनेक जण हॉटेल बंद केली आहेत. मात्र, आता कंपन्या सुरू होत असल्यामुळे काही प्रमाणात धंदा होऊ लागला आहे. पूर्ण क्षमतेने कंपन्या सुरू होण्याची आम्ही वाट पाहत आहोत.
- दिनेश रोकडे, स्नॅक्स सेंटर चालक, कल्याणीनगर
आयटी कर्मचारी आता उत्साहाने कंपनीमध्ये कामासाठी येऊन लागले आहे. इच्छेनुसार काहींना‘वर्क फ्रॉम’ची परवानगी देण्यात आली आहे. सध्या आठवड्यातून दोन ते तीन दिवस कंपनीत काम केले जात आहे. एप्रिल महिन्यात कंपनी पूर्ण क्षमतेने सुरू होईल.
- नेहा मोरे, व्यवस्थापक, आयटी कंपनी
कोरोनामुळे आयटी कंपन्यांतील कामाची पद्धत बदलली आहे. लॉकडाउनमध्ये ‘वर्क फ्रॉम’ देण्यात आले. आताही तीच पध्दत कायमस्वरूपी सुरू ठेवण्याची अट काही कंपन्या घालू लागल्या आहेत. मात्र, सर्वच कंपन्या असे करणार नाहीत. ५० टक्के कर्मचारी कंपनीत येऊ लागले आहेत. पुढील महिन्यात कंपन्या पूर्ण क्षमतेने सुरू होतील.
- रूपेश, एचआर विभाग, आयटी कंपनी
Web Title: Pune Hotels Waiting For Customers
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..