

Manjari Burglary Case: Gold Jewellery Stolen
Sakal
पुणे : शहरातील कात्रज आणि मांजरी परिसरातील दोन बंद सदनिकांमध्ये चोरट्यांनी घरफोडी करून सहा लाख ६१ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी भारती विद्यापीठ आणि मांजरी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कात्रजमधील निंबाळकरवाडी परिसरातील ऑरा नेस्ट सोसायटीतील एका सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी एक लाख १४ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.