

HSRP Deadline for Pune Vehicles
Sakal
पुणे : शहरातील २४ लाखांहून अधिक वाहनांना उच्च सुरक्षा नंबर प्लेट (एचएसआरपी) लावणे अनिवार्य आहे. त्यापैकी सुमारे साडेनऊ लाख वाहनांनीच नंबर प्लेटसाठी नोंदणी केली. सात लाख ५६ हजार ३५६ वाहनांना प्रत्यक्षात नंबर प्लेट लावण्यात आली, तर सुमारे १५ लाख वाहने अद्यापही नंबर प्लेटपासून दूर आहेत. रविवार (ता. ३०) नोंदणीसाठी अंतिम तारीख आहे.